000 03780nam a2200217Ia 4500
008 220817s9999 xx 000 0 und d
020 _a978-81-7185-731-9
082 _a525.5
_bBHA
100 _aBhagwat, Durga.
245 0 _aRituchakra
260 _bPopular Prakashan, Mumbai
_c2016
300 _a148p.
520 _aऋतूंच्या लावण्यमहोत्सवाची चित्रे रेखाटणारे हे ललितनिबंध आहेत. दुर्गाबाईंनी डोळे भरून सृष्टीचे दर्शन घेतले आहे. निसर्गाची बदलती रूपे, पशुपक्ष्यांच्या हालचाली, रंगगंधांच्या बोलक्या संवेदना त्यांनी एखाद्या शास्त्रज्ञाच्या डोळस कुतूहलाने न्याहाळल्या आहेत. परंतु या शास्त्रीय दृष्टिकोनाला काव्यात्म प्रतिभेची मिळालेली जोड, हे या ललित निबंधांचे खरे वैशिष्ट्य आहे. या सृष्टीतल्या सर्व सौंदर्याचा भौतिक आणि कलात्मक आस्वाद घेणारे सौंदर्यासक्त मन त्यांच्याजवळ आहे. तसेच, या तरल सौंदर्यानुभवांना सेंद्रिय रूप देण्याचे, या अतींद्रिय क्षणांना इंद्रियांकरवी अनुभवायला लावण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रतिभेत आहे. जाईजुईच्या झेल्यासारखे हातात धरून हुंगावेसे वाटणारे पर्जन्यरूप सूर्यबिंब, पोपटाच्या पिलांसारखी दिसणारी वडाची हिरवी पाने, पारिजातकाच्या मोत्यापोवळ्यांच्या राशीतून फुटणारे श्रावणाचे हसू, फुलांच्या पायघड्यांवरून भूतलावर पदार्पण करणारा पुष्पमंडित भाद्रपद… हे सारे रूपरसगंधांचे, लावण्यविभ्रमांचे जग दुर्गाबाईंचे हे निबंध वाचताना क्षणोक्षणी प्रत्ययाला येते. निसर्गाच्या चित्रलिपीचे रहस्य दुर्गाबाईंना उलगडले आहे, याची साक्ष या निबंधसंग्रहात पानोपानी मिळते. या लेखांचे सौंदर्य द्विगुणित करणारी पद्मा सहस्रबुद्धे यांची नाजूक, लयदार रेखाचित्रे आणि अतीव सुंदर मुखपृष्ठ हीसुद्धा या संग्रहाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
546 _aMarathi
650 _aEssays
650 _aLalit Literature
650 _aMarathi Literature
650 _aNature
650 _aSeasons
942 _cBKS
999 _c3128
_d3128